मँगो मॅजिक : मँगो कुल्फी आणि मँगो मस्तानी (Mang...

मँगो मॅजिक : मँगो कुल्फी आणि मँगो मस्तानी (Mango Magic: Mango Kulfi And Mango Mastani)

आंबा प्रेमींसाठी आंब्याची अत्यंत सोपी आणि मस्त कुल्फी कशी बनवायची ते आम्ही सांगत आहोत.

मँगो कुल्फी

फोटो सौजन्य – अ बिट व्होलसमली

साहित्य :

२ आंबे (पिकलेले आणि तुकड्यांत कापलेले)

अर्धा कप मलई किंवा फ्रेश क्रीम

२ कप दूध

१ कप कंडेंस्ड मिल्क

अर्धा टीस्पून वेलची पूड

अर्धा कप पीठी साखर (ऐच्छिक)

चिमूटभर केशर

थोडे बारीक केलेले पिस्ता-बदाम

कृती :

मिक्सरमध्ये कंडेंस्ड मिल्क, दूध, केशर, मलई / फ्रेश क्रीम, आंबा, वेलची पूड आणि साखर घालून व्यवस्थित फिरवून घ्या. त्यात बारीक केलेले बदाम-पिस्ता एकत्र करा.

तयार मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये घालून फ्रिजमध्ये ७-८ तास सेट होण्याकरिता ठेवा.

सर्व्ह करण्याच्या ५ मिनिटे आधी कुल्फी बाहेर काढून घ्या.

स्लाइस करून थंड थंड सर्व्ह करा.

 

मँगो मस्तानी

मँगो शेक तुम्ही अनेकदा पिता, आता मँगो मस्तानी करून पाहा. आंबा, दूध, व्हॅनिला आइस्क्रीम आणि सुकामेवा यांपासून बनणारी ही स्मूदी अतिशय टेस्टी असते. यावरील सजावट इतकी भारी असते की तोंडाला पाणी सुटते.

फोटो सौजन्य – फ्लेव्हर्स ऑफ मुंबई

 

साहित्य : मिल्क शेकसाठी:

३ मोठ्या पिकलेल्या आंब्याचा रस

दीड कप थंड दूध

३ टेबलस्पून साखर

७-७ पिस्ता, काजू आणि बादाम (स्लाइस मध्ये कापलेले)

६ स्कूप व्हॅनिला / मँगो आइस्क्रीम

६ चेरी सजावटीकरता (ऐच्छिक)

४-६ आइस क्यूब्स (ऐच्छिक)

१ कप पिकलेल्या आंब्याचे तुकडे कापून घेतलेले.

कृती :

मिक्सरमध्ये आंब्याचा रस, दूध आणि साखर घालून घट्ट मिल्कशेक बनवून घ्या.

नंतर एका मोठ्या ग्लासमध्ये आधी मिल्कशेक आणि आईस्क्रीम घाला. नंतर त्यात कापलेले नट्स आणि आंब्याचे तुकडे घालून टॉपिंग करा.

चेरीने सजवून थंडगार सर्व्ह करा.