आंब्याची खीर (Mango Magic :...

आंब्याची खीर (Mango Magic : Mango Kheer)

आंब्याची खीर

कच्चा आंबा म्हणजेच कैरीचा वापर आपण बहुतांशी चटणी वा लोणचं बनवण्याकरता करतो. परंतु आज आपण आंबट कैरीची गोड खीर बनवण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत. ही अगदी कमी वेळात बनते. तेव्हा नक्की करून पाहा.

साहित्य :

४ कच्चे आंबे किसून घ्या.

१ कप साखर

प्रत्येकी अर्धा – अर्धा लीटर कंडेंस्ड मिल्क आणि दूध

अर्धा टीस्पून वेलची पावडर

थोडेसे केशर, थोड्या मनुका

थोडे बदाम आणि काजू कापून घेतलेले

कृती :

किसलेला कच्चा आंबा पाण्यातून ४ ते ५ वेळा चांगला धुवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये २ कप पाणी आणि किसलेला आंबा घालून ५ मिनिटं उकळवा.

आंबा नरम झाला की आच बंद करा. मग सुती कापडातून ते गाळून घ्या.

पल्प वेगळा करून बाजूला ठेवा.

आता एका पॅनमध्ये दूध गरम करा. दूध दाट होईपर्यंत ढवळत राहा.

दूध पाव भाग राहिलं की त्यात साखर, वेलची पावडर आणि केसर घालून २ ते ३मिनिटं शिजू द्या. नंतर त्यात कच्च्या आंब्याचा पल्प घालून ५ मिनिटं शिजवा.

मग आच बंद करा. बदाम, काजू आणि मनुकांनी तयार खीर सजवा आणि सर्व्ह करा.