मँगो मॅजिक : मँगो बर्फी (Mango Magic: Mango Burfi)

मँगो मॅजिक : मँगो बर्फी (Mango Magic: Mango Burfi)

आंबा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंबा नुसताच खाण्यापेक्षा त्याच्या वेगवेगळ्या पाककृती करून खाल्ल्यांनतर त्याची चव वर्षभर जिभेवर रेंगाळत राहणार, हे निश्चित. ही मँगो बर्फी देखील तुम्हाला नक्की आवडेल.

 

साहित्य :  

२५० ग्रॅम मावा

पाव कप साखर

पाव कप आंब्याचा रस

थोडे केसर

वेलची पावडर

अर्धा टीस्पून पिस्ता-बदामाचे पातळ काप करून घ्या

 

कृती :

प्रथम एका कढईमध्ये मावा घालून मंद आचेवर माव्याला तूप सुटेपर्यंत परतून घ्या.

नंतर त्यात साखर आणि आंब्याचा रस घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.

त्यात केसर आणि वेलची पावडर घाला. नंतर हे मिश्रण तूप लावलेल्या एका थाळीमध्ये पसरवा.

त्यावर बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवा. नंतर बर्फी सेट होण्यासाठी ठेवा.

बर्फी सेट झाली की आपल्या आवडीच्या आकाराचे काप करा. तयार आंबा बर्फी सर्व्ह करा.

 

टीप – तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंब्याऐवजी चिकू, पपई, सिताफळ अशी फळं घेऊन वेगवेगळ्या फ्लेवरची बर्फी बनवू शकता.