मँगो मॅजिक: बेक्ड मँगो योगर्ट (Mango Magic : Ba...
मँगो मॅजिक: बेक्ड मँगो योगर्ट (Mango Magic : Baked Mango Yogurt)

By Shilpi Sharma in द्रौपदीची थाळी
गरमीने सगळ्यांना हैराण करून सोडलं असलं तरी या मोसमात आंबा खाण्याची मजा काही औरच आहे. आंब्याचे वेगवेगळे फ्लेवर तुम्ही चाखले असतील, मग आता आंब्याच्या बेक्ड फ्लेवरचा स्वाद घेऊन पाहा. हा स्वाद कायमचा लक्षात राहील.
बेक्ड मँगो योगर्ट
साहित्य :
२०० मि.ली. फ्रेश क्रीम
४०० मि.ली. कंडेंस्ड मिल्क
२५० ग्रॅम योगर्ट
५० ग्रॅम आंब्याचा रस
कृती :
ओव्हन १५० डिग्री सेल्सीअसला प्रीहिट करा.
नंतर सर्व साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करा.
हे मिश्रण बेकिंग ट्रेमध्ये घालून १५ मिनिटं बेक करा.
तयार बेक्ड मँगो योगर्ट सर्व्ह करा.