मँगो फ्लेवर्ड राइस आणि मँगो पायनॅपल स्मूदी (Man...

मँगो फ्लेवर्ड राइस आणि मँगो पायनॅपल स्मूदी (Mango Flavored Rice And Mango Pineapple Smoothie)

मँगो फ्लेवर्ड राइस
साहित्य : 1 कप बासमती तांदूळ (20 मिनिटं भिजवलेले), दीड कप दूध, 3 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून तूप, 2 आंब्यांचा गर, 2 आंबे स्लाइस केलेले.
कृती : एका पॅनमध्ये दूध उकळवत ठेवा. आता त्यात तांदूळ मिसळून उकळवा. साखर मिसळून झाकण लावून 15 मिनिटं मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात आंब्याचा गर आणि तूप मिसळून थोडा वेळ शिजवा. मँगो फ्लेवर्ड राइस आंब्याचे स्लाइस लावून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

मँगो पायनॅपल स्मूदी
साहित्य : 1 आंबा, पाव भाग अननस, 1 कप संत्र्याचा रस, थोडा बर्फाचा चुरा, सजावटीसाठी थोडे आंब्याचे लहान चौकोनी तुकडे आणि लिंबाची स्लाइस.
कृती : सजावटीचं साहित्य सोडून उर्वरित सर्व साहित्य एकत्र करून चांगलं बारीक ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. नंतर सर्व्हिंग ग्लासमध्ये हे मिश्रण भरून, आंब्याच्या फोडी आणि लिंबाच्या स्लाइसने सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.