मँगो दबका कढी (Mango Dabka Kadhi)

मँगो दबका कढी (Mango Dabka Kadhi)

मँगो दबका कढी

साहित्य : कढीसाठी : 1 हापूस आंबा, 2 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम दही, 1 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम मोहरी, 1 ग्रॅम मेथीदाणे, 1 दालचिनीचा तुकडा, 1 लवंग, 1 बोरी मिरची, 4 कडिपत्त्याची पानं, अर्धा ग्रॅम हळद, अर्धा ग्रॅम हिंग, 1 ग्रॅम तूप, 1 ग्रॅम हिरवी मिरचीची पेस्ट, 1 ग्रॅम आल्याची पेस्ट, चवीनुसार साखर.

पकोड्यासाठी : 50 ग्रॅम बेसन, 2 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम (तळण्यासाठी) तेल.

कृती : बेसनात मीठ आणि थोडं पाणी घालून भजांप्रमाणे मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या आणि बाजूला
ठेवून द्या. तूप थोडं गरम करून त्यात मोहरी, जिरं, दालचिनी, लवंग, मेथीदाणे, कडिपत्ते, बोरी मिरची, हिंग आणि हळद यांची फोडणी द्या. दही आणि आंब्याचा रस एकत्र करून त्यावर
ही फोडणी घाला. वरून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला. त्यात चवीनुसार साखर आणि मीठ एकत्र करा. त्यात बेसनाचे पकोडे घालून एक उकळी येऊ द्या. गरमागरम
मँगो दबका कढी भातासोबत सर्व्ह करा.