मँगो केक आणि जॅम (Mango Cake and Mango Jam)

मँगो केक आणि जॅम (Mango Cake and Mango Jam)

इंस्टंट मँगो जॅम
साहित्य : 2 कप आमरस, 1 टीस्पून लिंबाचा रस, 2 टीस्पून तूप, अर्धा कप पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : कढई मंद आचेवर गरम करा. त्यात आमरस घालून एक-दोन मिनिटं शिजवा. आमरसाला उकळी आली की, त्यात लिंबाचा रस, तूप आणि पिठीसाखर मिसळा. मिश्रण सतत ढवळत 15 मिनिटं शिजवा. नंतर आचेवरून उतरवून त्यात वेलची पूड मिसळा. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या हवाबंद बरणीत भरून फ्रीज ठेवा.
टीप : आमरसामध्ये थोडंही पाणी मिसळू नका.

 

मँगो पॅन केक
साहित्य : एका आंब्याचा रस, 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप ज्वारीचं पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, दोन तृतीयांश कप दूध, 1 टेबलस्पून मध, अर्धा कप साखर, 1 टीस्पून व्हेनिला इसेन्स, आवश्यकतेनुसार तेल, सजावटीसाठी आंब्याच्या बारीक फोडी.
कृती : तेल आणि मध सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यात घेऊन, चांगलं एकजीव करून घ्या. आता नॉनस्टिक पॅन गरम करून, त्यावर ब्रशच्या साहाय्याने तेल लावा. त्यावर 1 टेबलस्पून मिश्रण पसरवून मंद आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्या. प्रत्येक पॅनकेकवर थोडं-थोडं मध पसरवा. त्यावर आंब्याच्या बारीक फोडीने सजावट करून सर्व्ह करा.