मलाई कोफ्ता (Malai Kofta)

मलाई कोफ्ता (Malai Kofta)

मलाई कोफ्ता

साहित्य: 40 ग्रॅम पनीर, 2 बटाटे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोर, 1 टेबलस्पून मनुके, 1 टेबलस्पून काजू, तळण्यासाठी तेल, 1 कांदा, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची, अर्धा टीस्पून हळद, पाव कप टोमॅटो प्युरी, प्रत्येकी अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, धणे पूड व गरम मसाला , 2 टेबलस्पून मावा, पाव कप ताजे क्रीम, 1 टेबलस्पून काजूची पेस्ट व मीठ चवीनुसार.

कृती: कांद्याचे चार तुकडे करून उकडून घ्या. कांदा मऊ झाल्यावर पाणी काढून टाका. थंड होऊ द्या. कांद्याची पेस्ट बनवून घ्या. बटाटे उकडून सोलून घ्या. बटाटे कुस्करून त्यात किसलेले पनीर टाका. यात कॉर्नफ्लोर, मीठ, काजू व मनुके एकत्र करून गोळे बनवून घ्या. डिप फ्राय करा. एका कढईत तेल गरम करून कांद्याची पेस्ट टाकून परतून घ्या. यात लसूण पेस्ट, चिरलेली हिरवी मिरची, मीठ, हळद, धणे पूड व लाल मिरची पूड घालून परतून घ्या. टोमॅटो प्युरी टाकून मंद आचेवर शिजवून घ्या. आता मावा, काजू पेस्ट व पाणी टाकून 10 मिनिटे शिजवा. ताजे क्रीम व गरम मसाला टाका. सर्व्हिंग बाउलमध्ये कोफ्ते ठेवून त्यावर गरम-गरम ग्रेव्ही टाका. काजू, मनुके व ताज्या क्रीमने सजवून सर्व्ह करा.