मखान्याची खीर (Makhana Kheer)

मखान्याची खीर (Makhana Kheer)

मखान्याची खीर

साहित्यः १ लीटर दूध, पाव कप मखाना, २ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून पिस्ता बारीक करून, २ टीस्पून बदाम बारीक करून, १ टीस्पून वेलची पूड.

कृतीः एका पसरट भांड्यामध्ये दूध गरम करत ठेवा. आता मखाने बारीक कापून ते दुधामध्ये घाला. ते दूध १-२ तास मंद आचेवर उकळू द्या. दूध आटून घट्ट आणि अर्धे झाल्यावर त्यात साखर घाला. आता गॅस बंद करा. खीर थंड होऊ द्या. मग सर्व्ह करा.