धान्यांची बर्फी (Make Burfi From Grains)

धान्यांची बर्फी (Make Burfi From Grains)

By Atul Raut in

मुग बर्फी
साहित्य: 2 वाटया मुगडाळ, 1 वाटी दूध, अर्धी वाटी दूध पावडर, 1 वाटी खवा, 1 वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, 5 चमचे तूप.
कृती: मुगडाळ स्वच्छ धुवा. कोरडी करा. एका पॅनमध्ये 2 चमचे तूप तापवा. त्यावर हलकीशी परतवून घ्या. थंड करून मिक्सरमध्ये वाटा. त्याच पॅनमध्ये तूप तापवा. त्यावर खवा व पेस्ट परता . वरून साखर घाला. दूध पावडर व दूध घालून मिश्रण एकजीव करा. मंद आंचेवर मिश्रण आळेपर्यंत ठेवा. वेलचीपूड घालून खाली उतरवा. थाळीला तूप चोळावे. त्यावर बर्फी थापावी. थंड झाल्यावर वडी पाडावी.

पौष्टिक बर्फी
साहित्य: मूग, मटकी, मसूर प्रत्येकी अर्धी वाटी, 1 वाटी दूध,  1 वाटी खवा, दीड वाटी साखर, अर्धी वाटी लोणी.
कृती: दाली स्वच्छ धुवा. जाडसर वाटा. पॅनमध्ये लोणी ग्रेन करा. त्यावर डाळीचं वाटण घाला. खमंग परतवा. वरून खवा अन साखर घाला. आणि सातत्याने परतवत रहा. या मिश्रणात डावाने दूध घालत राहा. मंद आंचेवर बर्फीचं मिश्रण परतवून घ्या. थंड झाल्यावर मिश्रणाच्या वडया थापा.

बेसन बर्फी
साहित्य: दीड वाटी बेसन, दीड वाटी साखर, दीड वाटी कंडेन्स्ड मिल्क, पाव वाटी काजू काप, 1 चमचा वेलची पूड, तूप.
कृती: बेसन, साखर, मिल्क एकत्र कालवावे. पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यावर तयार मिश्रण घालावे. मंद आंचेवर शिजवून घ्यावे. मिश्रण एकजीव होऊन आळेपर्यंत सातत्याने हलवत राहावे. शेवटी काजू काप व वेलची पूड घालावी. बर्फीचा मिश्रण खाली लागू देऊ नायर. ट्रेमध्ये तूप चोळावे. त्यावर बर्फी थापावी. थंड झाल्यावर वाडी पाडावी.

वरई बर्फी
साहित्य: 1 वाटी वरई तांदूळ, 1 वाटी खावा, दीड वाटी साखर, अर्धी वाटी दूध, अर्धा चमचा दुधाचा मसाला, 2 चमचे तूप.
कृती: वरई स्वच्छ धुवा. नंतर पाणारी निथळून कोरडी करा. दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाट. एका पॅन मध्ये  तूप तापवा. त्यावर साखर परता. साखर विरघळायला लागल्यावर त्यात खावा घाला. दोन्ही परतून घ्या. वरून वरईचं मिश्रण घाला. मंद आंचेवर मिश्रण शिजवून घ्या. खाली उतरवून दुधाचा मसाला घाला. ट्रेला तुपाचा हात लावा. त्यावर बर्फीचे मिश्रण थापा. थंड झाल्यावर वडया पाडा.

 

शाबू बर्फी
साहित्य: 1 वाटी बारीक साबुदाणा, 2 वाटया दूध, 1 वाटी कंडेस्ड मिल्क, दीड वाटी साखर, अर्धा चमचा वेलची पूड.
कृती: साबुदाणा स्वच्छ धुवावा व पाण्यात भिजवून घ्यावा. नंतर हाताने मोकळा करावा. त्यात दूध घालावे व एकजीव कालवावे. एका पॅनमध्ये साखर तापवावी. त्यात साबुदाणा घालावा. मिश्रण व्यवस्थित परताव. वरून कंडेस्ड मिल्क घालून मिश्रण दाट होईपर्यंत परतत रहावे. साबुदाण्याचं मिश्रण एकसंध झाल्यावर खाली उतरावे. वेलची पूड घालून कालवावे. ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापावी. थंड झाल्यावर वडी पाडावी.

राईस बर्फी

साहित्य: 1 वाटी आंबेमोहोर गोड वासाचा तांदूळ, 1 वाटी साखर , 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी दूध व खवा, अर्धा चमचा वेलची पूड, 4 चमचे तूप.
कृती: तांदूळ स्वच्छ धुवा. एका पॅनमध्ये दूध तापवा. त्यावर तांदूळ घाला. हलकेसे परतल्यावर त्यात खवा घालावा व मिश्रण दाट होईपर्यंत परता. वरून मिल्क पावडर घाला. खमंग व दाटसर परतवून घ्या. खाली उतरवा. ट्रेला तुपाचा हात लावावा. त्यावर बर्फी थापून घ्यावी. थंड झाल्यावर वडी पाडावी.