महाशिवरात्र स्पेशल: समोसा आणी बटाटा वडा (Mahash...

महाशिवरात्र स्पेशल: समोसा आणी बटाटा वडा (Mahashivratri Special: Samosa And Potato Vada)

समोसा

साहित्यः 150 ग्रॅम राजगीरा पीठ, 5 मध्यम आकाराचे बटाटे, 6-7 काळी मिरी, 3-4 सुक्या लाल मिरच्या, पाव टीस्पून जिरे, पाव टीस्पून धणे, छोटा तुकडा दालचिनी, फोडणीसाठी तूप, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृतीः प्रथम बटाटे उकडून घ्या. एका पॅनमध्ये तूप गरम करून जिरं, मिरच्या काळी मिरी पूड, धणे पूड, मीठ घालून फोडणी करून बटाट्याची भाजी बनवून घ्या. राजगिर्‍याच्या पिठात थोडे मीठ व तेलाचे मोहन घालून पीठ मळून घ्या. या पिठाची पुरी लाटून मधोमध कापून एका भागावर बटाट्याचे सारण भरून समोशाचा आकार द्या. गरम तेलात सोनेरी रंगावर तळून नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

बटाटा वडा

साहित्यः 5-6 उकडलेले बटाटे, 3-4 हिरव्या मिरच्या, जिरे, कढीपत्ता, मूग डाळीचे पीठ, मीठ चवीनुसार.

कृतीः बटाट्याची उपवासाची भाजी करतो त्याप्रमाणे भाजी करून घ्यावी. मूग डाळ 7-8 तास भिजवून नंतर वाटून त्याचे पीठ तयार करावे. बटाट्याच्या भाजीचे गोळे तयार करून मूग डाळीच्या पीठात घोळवून तेलात तळून घ्यावेत. नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.