महाशिवरात्र स्पेशल: उपवासाची शेव पुरी (Mahashiv...
महाशिवरात्र स्पेशल: उपवासाची शेव पुरी (Mahashivratra Special: Fasting Shev puri)

उपवासाची शेवपुरी
साहित्यः 4 उकडलेले बटाटे, 250ग्रॅम राजगीरा पीठ, शेंगदाणे, बटाट्याचा चिवडा, खजूराची चटणी, हिरवी चटणी, मीठ व सौंधव चवीनुसार, सजावाटीसाठी डाळींबाचे दाणे व कोथिंबिर
कृतीः प्रथम राजगिर्याच्या पीठात मीठ घालून मळून घ्या. या पिठाच्या छेट्या पुर्या लाटा व तळून घ्या. ( बाजारात उपवासासाठी राजगिर्याच्या पुर्या मिळतात त्या वापरल्या तरी चालतील.)
बटाटा कुस्करून त्यात मीठ घाला. एका प्लेटमध्ये तळलेल्या पुर्या मांडून त्यावर बटाटा, शेंगदाणे, चटण्या घाला. बटाट्याचा चिवडा, डाळींबाचे दाणे व कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.