महाशिवरात्र स्पेशल: ढोकळा प्रकार-2 (Mahashivrat...

महाशिवरात्र स्पेशल: ढोकळा प्रकार-2 (Mahashivratra Special: Dhokala-2)

ढोकळा प्रकार-2

साहित्यः 250 ग्रॅम वरीचे तांदूळ,1 कप दही, 2-3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, मीरपूड, जिरे, कढीपत्ता, मीठ.

कृतीः प्रथम वरी तांदूळ 3-4 तास भिजत ठेवावा. त्यानंतर वरी तांदूळ जाडसर वाटून घ्यावे. त्यात दही, हिरव्या मिरचीची पेस्ट व मीठ घालावे व मिश्रण एकजीव करावे. हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर ताटाला तेलाचा हात फिरवून वरील मिश्रण ताटात ओतावे. मोठ्या पातेल्यात किंवा ताट वर बसेल अशा भांड्यात 2 ग्लास पाणी घेऊन त्यात ढोकळ्याचे ताट ठेवावे. त्यावर झाकण ठेवून साधारण 15 मिनिटे वाफवून घ्यावे. नंंतर सुरीचे टोक घालून ढोकळा झाला आहे की नाही ते तपासून पाहा. सुरीच्या टोकाला मिश्रण चिकटले नाही तर समजावे की, ढोकळा तयार आहे. ढोकळा थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून त्यावर जिर्‍याची फोडणी द्यावी व नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.