महाशिवरात्र स्पेशल: ढोकळा प्रकार-1 (Mahashivrat...

महाशिवरात्र स्पेशल: ढोकळा प्रकार-1 (Mahashivratra Special: Dhokala -1)

उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, वडे, वरी तांदूळाचे पदार्थ अशी मोजकीच नावे आपण घेतो. पण उपवासाच्या दिवशी कोणी समोसे खायला दिले तर…नेहमीचेच उपवासाचे पदार्थ खाण्यापेक्षा या महाशिवरात्रीला थोडे वेगळे पदार्थ बनवायला काय हरकत आहे…

ढोकळा प्रकार-1

साहित्यः 250 ग्रॅम मूग डाळ, 2-3 हिरव्या मिरच्या, पाव कप दही, इनो छोटे पॅकेट, जिरे, मीठ चवीनुसार.

कृतीः मूग डाळ 7-8 तास भिजत ठेवा. त्यानंतर त्यात मिरच्या व मीठ घालून डाळ वाटून घ्या. वाटलेल्या डाळीत दही घालून मिश्रण 5-6 तास तसेच ठेवा. नंतर त्यात थोडे इनो घालून लगेच ढोकळा वाफवण्यास ठेवावा. थंड झाल्यावर झाल्यावर त्याचे तुकडे करून कढीपत्ता, जिरे यांची फोडणी द्यावी. नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.