कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi)

कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi)

कोथिंबीर वडी

साहित्य : 1 कोथिंबिरीची जुडी, 2 कप बेसन, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पूड, 2 टीस्पून धणे पूड, 2 टीस्पून जिरे पूड, 1 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून साखर, 1 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : कोथिंबीर निवडून स्वच्छ धुऊन कोरडी करा. पूर्णतः कोरडी झाल्यावर बारीक चिरून घ्या. नंतर त्यात हळद, लाल मिरची पूड, मीठ, धणे-जिरे पूड, साखर आणि तीळ घालून एकजीव करा. हे मिश्रण 15-20 मिनिटं झाकून ठेवून द्या. नंतर त्यात मावेल इतकं बेसन घाला. गरज भासल्यास थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळा. पिठाला तेलाचा हात लावून लांबट रोल करून घ्या. हे रोल मोदकाप्रमाणे शिजवून घ्या. साधारण 20 मिनिटांत ते शिजतात. थंड झाल्यावर त्याच्या पातळ वड्या पाडा. नंतर या वड्या गरम तेलात तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत गरमागरम कोथिंबीर वडी सर्व्ह करा.