कोकम सरबत (Kokum Sarbat)

कोकम सरबत (Kokum Sarbat)

कोकम सरबत

साहित्य : अर्धा किलो कोकमाची फळं, 1 किलो साखर.

कृती : कोकमाची पिकलेली फळं घेऊन, त्याचे चिरून समान दोन भाग करा. ते वाटीच्या आकाराचे होतील. त्यातील बिया काढून, त्यात साखर भरा. एका काचेच्या बरणीत साखर भरलेल्या कोकमाच्या वाट्या साखर सांडणार नाही अशा प्रकारे भरा. त्यावर उर्वरित साखर व्यवस्थित पसरवा. ही कोकमाची बरणी दोन ते तीन दिवस थेट उन्हात न ठेवता, तशीच बाहेर ठेवा. दोन-तीन दिवसांनी फळाला चांगला रस सुटतो. सरबत बनवण्यासाठी ः पाऊण ग्लास पाण्यामध्ये आवश्यकतेनुसार कोकमाचं सरबत आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. हे मिश्रण गाळून सर्व्ह करा.