वाळा सरबत (Khus Sarbat)

वाळा सरबत (Khus Sarbat)

वाळा सरबत

साहित्य : 50 ग्रॅम वाळा, अर्धा किलो साखर, चिमूटभर सायट्रिक अ‍ॅसिड.

कृती :
अर्धा लीटर गरम पाण्यात वाळा दिवसभर भिजत ठेवा. मध्ये मध्ये वर-खाली करत राहा. दुसर्‍या दिवशी वाळ्याचं पाणी गाळून घ्या. वाळ्याच्या या पाण्यात साखर घालून पाक बनण्यासाठी गॅसवर उकळत ठेवा. साखर विरघळल्यानंतर चमचाभर पाण्यात सायट्रिक अ‍ॅसिडचं मिश्रण तयार करून, ते पाकात घाला. दोन तारी पाक झाल्यावर आच बंद करा. पाक थंड झाल्यावर हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा.लाभ : उन्हाळ्यात या सुगंधित सरबताच्या सेवनाने विशेष फायदा होतो. शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. डोकं शांत ठेवण्यासही हे सरबत उपयुक्त आहे.