अंजीरची खीर (Kheer Made Up of Fig)

अंजीरची खीर (Kheer Made Up of Fig)

अंजीरची खीरसाहित्य :
1 लीटर दूध, 5-6 बारीक चिरलेले अंजीर, अर्धा कप बारीक चिरलेले मकाणे, 1 कप साखर, अर्धा टीस्पून वेलची व जायफळ पूड.

कृती : दूध दाट होईपर्यंत उकळवून घ्या. त्यात अंजीर घालून मंद आचेवर शिजवा. नंतर मकाणे आणि साखर घालून पाच मिनिटं शिजवा. आता त्यात वेलची व जायफळ पूड घालून एकत्र करा आणि आचेवरून खाली उतरवा. अंजिराची ही खीर गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा.