खिमा सल्ली (Kheema Salli)

खिमा सल्ली (Kheema Salli)

साहित्य : 250 ग्रॅम मटण किंवा खिमा, 1 कांदा बारीक चिरून, 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा कप टोमॅटो प्युरी, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला पावडर, अर्धी वाटी तेल किंवा तूप, 1 तमालपत्र, 1 टीस्पून जिरे, 2 बटाटे पातळ तुकडे करून चवीनुसार मीठ
कृती : मटण चांगले धुवून घ्या. हंडीत तूप गरम करा. त्यात तमालपत्र आणि जिरे घालून सोनेरी होऊ द्या. कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला पावडर घालून शिजवून घ्या. आता मटण, पाणी आणि टोमॅटो प्युरी घालून हंडी झाकून ठेवा आणि मटण शिजेपर्यंत शिजवा. कढईत तेल गरम करून त्यात पातळ चिरलेले बटाटे तळून घ्या. तयार मटण बटाट्याने सजवून सर्व्ह करा.