खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)

खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)

खट्टा मीठा राइस (Khatta Meetha Rice)

खट्टा मीठा राइस, Khatta Meetha Rice
साहित्य : 2 वाट्या बासमती तांदूळ, 1 वाटी साखर, अर्धी वाटी ओलं खोबरं, पाव वाटी लिंबाचा रस, 4-5 केशर काड्या, पाव वाटी दूध, चवीनुसार मीठ, पाव वाटी तूप, अर्धी वाटी सुकामेवा.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन, दोन तास भिजत ठेवा. एका कुकरमध्ये तूप गरम करून, त्यात सुकामेवा तळून घ्या. त्यातच तांदूळही परतवा. त्यात साडेतीन वाट्या पाणी घालून, एकदा ढवळून झाकण लावून एक शिटी काढा. तुपामुळे हा भात मोकळा होईल. कुकर थंड झाल्यावर, भात परातीत पसरवून ठेवा.
एका पातेल्यात थोडं तूप गरम करून, त्यावर लिंबाचा रस आणि साखर घाला. साखर थोडी वितळू लागली की, त्यात दूध आणि केशर घाला. मिश्रण एकदा ढवळून घ्या. उकळी आल्यावर त्यात मोकळा व थंड झालेला भात, केशर आणि मीठ घाला. आता हा भात हलक्या हाताने खालपासून हलवा. त्यावर ओलं खोबरं घालून एक वाफ काढा आणि खट्टा-मीठा राइस गरमागरम सर्व्ह करा. हे पण वाचा:

चायनीज भजी (Monsoon Special : Chinese Bhajiya)