खजुराचं लोणचं (Khajur pickle)

खजुराचं लोणचं (Khajur pickle)

खजुराचं लोणचं


साहित्य : 1 कप बिया काढून चिरलेले खजूर, अर्धा टीस्पून मोहरी, 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट, 2 टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 2-4 कडिपत्ते,
1 टीस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात कडिपत्ता घालून परतवा. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतवा. त्यानंतर अर्धा कप पाणी आणि खजूर घाला. उकळी आली की, आच मंद करून झाकण लावा आणि मिश्रण शिजू द्या. काही मिनिटांतच खजूर शिजतील. नंतर त्यात मीठ, मिरची पूड आणि चिंचेचा कोळ घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून, दाट होईपर्यंत शिजवा. शेवटी त्यात हिंग घालून व्यवस्थित एकजीव करा. मिश्रण आचेवरून उतरवून पूर्णतः थंड होऊ द्या. लोणचं लगेच वापरायचं नसेल तर, स्वच्छ हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा.