खजूर पाक (Khajur Paak)

खजूर पाक (Khajur Paak)

खजूर पाक


साहित्य : अर्धा किलो बिया काढलेले खजूर, अर्धा किलो मावा, पाव किलो साखर, 1 कप दूध, थोडे काजू-बदामाचे पातळ काप.

कृती :
एका कढईत दूध आणि खजूर मंद आचेवर सतत ढवळत शिजत ठेवा. खजूर पूर्णतः विरघळायला हवेत. नंतर त्यात साखर घालून मिश्रण दाट होईपर्यंत शिजवा. मिश्रण सतत ढवळत राहा. त्यात मावा कुस्करून घाला. मिश्रण व्यवस्थित गोळा होईपर्यंत सतत ढवळून शिजवा. आता एका ट्रे किंवा ताटाला तुपाचा हात लावा. त्यात खजुराचं मिश्रण ओतून सारखं करा. त्यावर काजू-बदामाचे काप पसरवा. मिश्रण थंड झालं की, त्याच्या वड्या पाडा.