खजूर खीर (Khajur Kheer)

खजूर खीर (Khajur Kheer)

खजूर खीर


साहित्य : 10-12 बिया काढलेले खजूर, साडे तीन कप दूध, पाव कप अक्रोड, अर्धा कप बदाम, 1 टेबलस्पून मनुका, अर्धा टीस्पून वेलची पूड, 1 टेबलस्पून तूप, काही केशराच्या काड्या.

कृती :
खजूर, बदाम आणि अक्रोड भिजतील इतपत कोमट दुधात 15 मिनिटं भिजत ठेवा. नंतर थोडे बदाम बाजूला काढून ठेवून उर्वरित सर्व बदाम, खजूर आणि अक्रोड मिक्सरमध्ये
बारीक वाटून घ्या.
आता एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये मध्यम आचेवर तूप गरम करत ठेवा. त्यात मनुका आणि बाजूला ठेवलेले बदाम काही सेकंद परतवा. नंतर बाजूला काढून ठेवा. त्याच पातेल्यात उर्वरित दूध मोठ्या आचेवर उकळू द्या. उकळी आली की, आच मंद करून त्यात केशराच्या काड्या घाला. पाच मिनिटं मंद आचेवर ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. आता आच बंद करून त्यात तुपात परतलेले मनुका-बदाम आणि खजूरचं मिश्रण घाला. वेलची पूड घालून, मिश्रण चांगलं एकजीव करा. गरमागरम खीर सर्व्ह करा.