खजुराची चटणी (Khajur Chutney)

खजुराची चटणी (Khajur Chutney)

खजुराची चटणी

साहित्य : 14-15 बिया काढलेले खजूर, लिंबाएवढा चिंचेचा गोळा, पाव कप किसलेला गूळ, पाव चमचा लाल मिरची पूड, 4-5 पुदिन्याची पानं, 1 टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून जिरे पूड, चिमूटभर काळं मीठ, स्वादानुसार मीठ.
कृती : अर्धा कप पाणी उकळून आच बंद करा आणि त्यात चिंच घाला. झाकण लावून अर्धा तास चिंच भिजू द्या. चिंचेचं मिश्रण साधारण थंड झालं की, मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर गाळून घ्या. खजूर भिजतील इतक्या कोमट पाण्यात दोन तास भिजत ठेवा. नंतर पाण्यातून काढून मिक्सरमधून बारीक वाटा. त्यातच चिंचेचं मिश्रण, लाल मिरची पूड, पुदिना, गूळ, धणे-जिरे पूड, काळं मीठ आणि साधं मीठ घालून अगदी बारीक वाटा.