कठोल कैरी समोसा (Kathol Kairi Samosa)

कठोल कैरी समोसा (Kathol Kairi Samosa)

कठोल कैरी समोसा

साहित्य : सारणासाठी : 10 ग्रॅम काबुली चणे, 10 ग्रॅम देशी चणे, 10 ग्रॅम मूग, 10 ग्रॅम चवळी, 10 ग्रॅम मटकी, 1 कैरी, अर्धा कांदा, 2 ग्रॅम लसूण, 50 ग्रॅम बटाटे, 5 ग्रॅम मीठ, 1 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम मोहरी, 1 ग्रॅम धणे, 1 ग्रॅम कोथिंबीर, 1 ग्रॅम पुदिना, 50 ग्रॅम तेल.

पारीसाठी : 5 ग्रॅम तूप, 50 ग्रॅम मैदा, 1 ग्रॅम ओवा, 1 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 ग्रॅम हळद, 1 ग्रॅम धणे पूड, 1 ग्रॅम हिरवी मिरची, 1 ग्रॅम आलं.

कृती : काबुली चणे, देशी चणे, मूग, चवळी, मटकी व्यवस्थित शिजवून घ्या. नंतर एकत्र करून ठेवा कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कडिपत्ता, धणे, बारीक चिरलेला कांदा आणि लसणाची पेस्ट यांची फोडणी द्या. आता ही फोडणी शिजवलेल्या कडधान्यांवर घाला. त्यात किसलेली कैरी, शिजवून बारीक चिरलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना, हिरवी मिरची पेस्ट आणि मीठ घालून एकजीव मिश्रण तयार करा. पारीसाठीचं सर्व साहित्य एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या. याच्या समोशाच्या पट्ट्या तयार करून त्यामध्ये सारण भरून लहान लहान समोसे तयार करा आणि गरम तेलामध्ये सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम कठोल कैरी समोसे टोमॅटो सॉस आणि हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.