कलिंगडाचं सरबत (Kalingad sarbat)

कलिंगडाचं सरबत (Kalingad sarbat)

कलिंगडाचं सरबत (पारशी पद्धतीचं)

साहित्य : 1 कलिंगड, अर्धा लीटर दूध, 100 ग्रॅम साखर, थोड्या लाल गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबपाणी.

कृती : कलिंगड एक ते दोन तास पाण्यात ठेवा. नंतर चिरून सालं, बिया काढून टाका. लाल गुलाबाच्या पाकळ्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर कलिंगडासोबत मिक्सरमधून बारीक करून घ्या. हा गर तीन-चार तास फ्रीजमध्ये ठेवा. आयत्या वेळी त्यात दूध आणि गुलाबपाणी घालून पिण्यास द्या. कलिंगडाचं शाही सरबत बनवण्यासाठी ः कलिंगडाचे स्कूपरने लहान-लहान स्कूप काढून, एक-दोन तास फ्रीजमध्ये ठेवा. एका ग्लासमध्ये सर्वप्रथम बर्फाचा चुरा आणि गुलाबपाणी घाला. त्यावर कलिंगडाचे स्कूप घालून, वरून कलिंगडाचा रस घाला.