काजू मोदक (Kaju Modak)

काजू मोदक (Kaju Modak)

साहित्य : अर्धा किलो ताजा खवा, पाव किलो काजूचे तुकडे, 2 वाटी पिठीसाखर, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : काजू रात्रभर भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट करून घ्या. खवा मंद आचेवर भाजा. नंतर त्यात काजूची पेस्ट, वेलची पूड आणि पिठीसाखर घालून एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर सतत परतवत राहा. मिश्रणाचा गोळा तयार
झाल्यावर आच बंद करा. हे मिश्रण थोडं थंड झालं की, ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यात गच्च भरून मोदक तयार करा.