कैरी-मेथी थेपला (Kairi- Methi Thepala)

कैरी-मेथी थेपला (Kairi- Methi Thepala)

कैरी-मेथी थेपला

साहित्य : थेपल्यासाठी : 1 कैरी, 5 ग्रॅम मीठ, 1 ग्रॅम जिरं, 2 ग्रॅम तूप, 100 ग्रॅम गव्हाचं पीठ, 5 ग्रॅम मेथीची पानं, 2 ग्रॅम कोथिंबीर, 1 ग्रॅम अख्खे धणे, 1 ग्रॅम हिरवी मिरची, 1 ग्रॅम आलं.
मुरांब्यासाठी : 1 कैरी, 1 ग्रॅम मिरची पूड, 2 ग्रॅम गूळ, 1 ग्रॅम मीठ.

कृती : गव्हाच्या पिठात कैरीचा कीस, मीठ, जिरं, तूप, बारीक चिरलेली मेथीची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे, हिरवी मिरची पेस्ट आणि आलं पेस्ट घालून व्यवस्थित मळून घ्या. पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून थेपले लाटा आणि गरम तव्यावर व्यवस्थित शेकून घ्या. गरमागरम कैरी-मेथी थेपले लोणच्यासोबत सर्व्ह करा.
कैरी किसून त्यात मिरची पूड, गूळ आणि मीठ एकत्र करा. गरमागरम थेपले या ताज्या मुरांब्यासोबत सर्व्ह करा.