कैरी-कांदा भजी विथ रॉ मँगो चटणी (Kairi- kanda B...

कैरी-कांदा भजी विथ रॉ मँगो चटणी (Kairi- kanda Bhajiya With Raw Mango Chutney)

कैरी-कांदा भजी विथ रॉ मँगो चटणी

साहित्य : भजीसाठी : अर्धा कांदा, अर्धी कैरी, 1 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम बेसन, 1 ग्रॅम मिरची, 1 ग्रॅम आलं 1 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा ग्रॅम साखर, 2 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम (तळण्यासाठी) तेल.
चटणीसाठी : अर्धी कैरी, 1 ग्रॅम गूळ, 1 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम मिरची, 1 ग्रॅम काश्मिरी मिरची पूड, 2 ग्रॅम मीठ.
कृती : कांदा आणि कैरी बारीक चिरून, बेसनात एकत्र करा. त्यात जिरं, मिरची पूड, आल्याची पेस्ट कोथिंबीर, साखर आणि मीठ घालून व्यवस्थित एकत्र करा. नंतर त्यात थोडं पाणी एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण थोडं थोडं गरम तेलात घाला आणि सोनेरी रंगावर भजी तळून घ्या. चटणीसाठीचं सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. गरमागरम कैरी-कांदा भजी कैरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.