कढई चिकन (Kadhai Chicken)

कढई चिकन (Kadhai Chicken)

साहित्य : मॅरिनेशनसाठी : 400 ग्रॅम बोनलेस चिकनचे तुकडे, 1 टेबलस्पून ताजं दाट दही, पाव टीस्पून काळी मिरी पूड, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धणे पूड, पाव टीस्पून आल्याची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून कसुरी मेथीची पूड.
ग्रेव्हीसाठी : 1 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून आल्याची पेस्ट, पाव टीस्पून हळद, 4 उकडलेल्या कांद्यांची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून धणे पूड, अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, अर्धा टीस्पून कसुरी मेथी पूड, 4 टोमॅटोंची प्युरी, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून फ्रेश क्रीम, 2 सिमला मिरची, 3 कांदे (सिमला मिरची आणि कांदे 1 टेबलस्पून तेलात परतवून घ्या).
कृती : मॅरिनेशनचं सर्व साहित्य एका वाडग्यात चांगलं एकजीव करा. हे मिश्रण चिकनच्या तुकड्यांना चोळून मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा, आलं आणि लसणाची पेस्ट घालून सोनेरी रंगाची होईपर्यंत परतवून घ्या. त्यात सर्व सुक्या मसाल्यांची पूड, मीठ आणि टोमॅटो प्युरी घालून परतवा. मिश्रणाला तेल सुटेपर्यंत परतवा. नंतर त्यात मॅरिनेट केलेलं चिकन आणि आवश्यकतेनुसार पाणी मिसळून, झाकण लावून शिजत ठेवा. चिकन व्यवस्थित शिजवून घ्या. आवश्यकता भासल्यास आणखी पाणी घाला. ग्रेव्ही दाट झाल्यावर त्यात कांदा आणि सिमला मिरची घालून, मिरची नरम होईपर्यंत शिजवा. शेवटी वरून फ्रेश क्रीम घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.