जिरा आलू (Jeera Aloo)
जिरा आलू (Jeera Aloo)

जिरा आलू
साहित्य: 3 मोठे बटाटे (चौकोनी आकारात कापून घ्या), दीड टीस्पून जिरे, दीड टीस्पून लाल तिखट, 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून धणे पावडर, 2 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ.
कृती : कढईत तेल गरम करा. जिरे घाला. जिरे तडतडल्यावर आच कमी करून उर्वरित सर्व साहित्य घाला. झाकण ठेवून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवा. मसाला जळल्यासारखा वाटल्यास त्यात थोडे पाणी शिंपडा. कोथिंबिरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.