जांभळाचं सरबत (Jambool Sarbat)

जांभळाचं सरबत (Jambool Sarbat)

जांभळाचं सरबत

साहित्य : अर्धा किलो जांभूळ, 250 ग्रॅम साखर, चिमूटभर सायट्रिक अ‍ॅसिड, अर्धा टेबलस्पून सोडियम बेन्झोएट.

कृती : पाव लीटर पाण्यामध्ये जांभूळ घालून 10 मिनिटं उकळा. थंड झाल्यावर जांभळातून बी काढून टाका. जांभळाचा गर मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर गाळून घ्या. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये साखर आणि साखर बुडेपर्यंत पाणी घालून मध्यम आचेवर गरम करत ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अ‍ॅसिड घाला. पाण्यावर आलेली मळी काढून टाका. या मिश्रणाचा दोन तारी पाक तयार करा. पाक तयार झाल्यावर थंड होऊ द्या. नंतर त्यात जांभळाचा रस आणि हवं असल्यास खाण्याचा जांभळा रंग घाला. हा रस कापडाने गाळून, त्यात सोडियम बेन्झोएट घाला. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा.