जॅम बेसन लाडू (Jam Besan Laddu)

जॅम बेसन लाडू (Jam Besan Laddu)

जॅम बेसन लाडू


साहित्य : 2 कप बेसन, दीड कप पिठीसाखर, 1 टेबलस्पून वेलची पूड, 1 कप साजूक तूप, 3 टेबलस्पून सफरचंदाचं जॅम, 3 टेबलस्पून सुक्या खोबर्‍याचा कीस.

कृती : कढईत बेसन तुपावर चांगलं लालसर भाजून घ्या. बेसन व्यवस्थित भाजायला हवं. नंतर ते पूर्णतः थंड होऊ द्या. आता या बेसनात साखर आणि वेलची पूड मिसळून चांगलं मळून घ्या. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
आता एका बशीत जॅम आणि दुसर्‍या बशीत खोबर्‍याचा कीस पसरवून घ्या. बेसनाचा प्रत्येक लाडू प्रथम जॅममध्ये घोळवून, नंतर खोबर्‍याच्या किसात घोळवा. अर्थात, प्रत्येक लाडवावर जॅम आणि खोबर्‍याच्या किसाचा पातळ थर लागायला हवा. हे करताना लाडवाचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्या. आता हे लाडू पाच ते दहा मिनिटं सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे लाडू चार-पाच दिवस चांगले टिकतात.