शिंगाड्याची जिलेबी (Jalebi of Different Flavour)

शिंगाड्याची जिलेबी (Jalebi of Different Flavour)

शिंगाड्याची जिलेबी

शिंगाड्याची जिलेबी, Jalebi of Different Flavour
साहित्य : 1 कप शिंगाड्याचं पीठ, 1 टेबलस्पून ताजं व घट्ट दही, 1 टेबलस्पून तूप, दीड कप उकडून कुस्करलेले बटाटे, आवश्यकतेनुसार साखरेचा पाक, पाव टीस्पून वेलची पूड, काही केशराच्या काड्या, थोडा खायचा नारिंगी रंग (ऐच्छिक), तळण्यासाठी तूप.
कृती : शिंगाड्याच्या पिठामध्ये दही, तूप आणि गरम पाणी एकत्र करून मिश्रण तयार करा. हे मिश्रण 24 तासांसाठी झाकून ठेवून द्या. नंतर त्यात कुस्करलेले बटाटे घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. स्मूथ मिश्रण तयार व्हायला हवं. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी आणि हवा असल्यास नारिंगी रंग एकत्र करून जिलेबीप्रमाणे मिश्रण तयार करून घ्या. साखरेच्या पाकामध्ये वेलची पूड आणि केशर एकत्र करून घ्या. जिलेबीचं मिश्रण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून, गरम तुपामध्ये जिलेब्या पाडा आणि तळून घ्या. गरमागरम जिलेबी साखरेच्या पाकामध्ये 15-20 मिनिटं बुडवून ठेवा. नंतर सर्व्ह करा.