इटालियन चॉकलेट ट्रफल्स (Italian Chocolate Truff...

इटालियन चॉकलेट ट्रफल्स (Italian Chocolate Truffles)

इटालियन चॉकलेट ट्रफल्स

साहित्य : 175 ग्रॅम डार्क चॉकलेट (किसलेली), 2 टेबलस्पून ऑरेंज लिकर, 40 ग्रॅम बटर, 4 टेबलस्पून पिठीसाखर, 50 ग्रॅम बदाम (बारीक तुकडे केलेले), 50 ग्रॅम चॉकलेट (किसलेली).
कृती : एका पॅनमध्ये डार्क चॉकलेट आणि ऑरेंज लिकर विरघळून घ्या. नंतर त्यात बटर घालून चांगलं एकजीव करा. त्यात पिठीसाखर आणि बदाम मिसळा आणि मिश्रण थंड करत ठेवा. मिश्रण साधारण थंड झाल्यावर त्याचे लहान गोळे तयार करा. हे गोळे किसलेल्या चॉकलेटमध्ये घोळून सर्व्ह करा.