इंस्टंट चकली (Instant Chakli)

इंस्टंट चकली (Instant Chakli)

इंस्टंट चकली

साहित्य : 2 वाटी उकडलेल्या बटाट्याचा कीस, अर्धा वाटी तीळ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, दीड टेबलस्पून गरम मसाला, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून आमचूर पूड, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य एका मोठ्या वाडग्यात चांगलं एकजीव करून घ्या. पीठ चांगलं मळून घ्या. चकलीच्या साच्याला तेलाचा हात लावून त्यात हे
मिश्रण भरा आणि चकल्या पाडून घ्या. या चकल्या गरम तेलात मोठ्या आचेवर तळून घ्या. इंस्टंट चकल्या दह्यासोबत सर्व्ह करा.