स्वातंत्र्य दिन स्पेशल : तिरंगी रेसिपी (Indepe...

स्वातंत्र्य दिन स्पेशल : तिरंगी रेसिपी (Independence Day Special Tricolor Recipes)

तिरंगी रवा ढोकळा
साहित्यः 3 कप सुजी, 3 कप दही, 1 टेबलस्पून हिरवी चटणी, अर्धा टेबलस्पून आलं- हिरव्या मिरचीची पेस्ट, 2 टेबलस्पून गाजरची प्युरी, अर्धा टेबलस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून फ्रुट सॉल्ट, 2 लिंबाचा रस.
फोडणीसाठीः 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून राई, थोडेसे कढिपत्ते, 2-3 हिरव्या मिरच्या (उभ्या चिरलेल्या)
कृतीः एका भांड्यामध्ये सुजी आणि दही एकत्र करून 30 मिनिटं झाकून ठेवा. नंतर त्यात बेकिंग सोडा आणि मीठ घालून चांगलं फेटून घ्या. तयार मिश्रणाचे तीन सारखे भाग करा. ग्रीन ढोकळ्यासाठी एका भागामध्ये हिरवी चटणी मिसळून फेटा. ऑरेंज ढोकळ्यासाठी मिश्रणाच्या दुसर्‍या भागात गाजर प्युरी, लाल मिरची पावडर आणि ऑरेंज कलर मिसळून फेटा. तिसरा भाग तसाच ठेवा. नंतर तिन्ही रंगाचे मिश्रण वेगवेगळ्या ताटामध्ये ओतून 10 ते 12 मिनिटं वाफेवर शिजू द्या. अशाच प्रकारे तिन्ही रंगांचा ढोकळा बनवून घ्या.
सजावट करतानाः सुरुवातीला ताटात हिरव्या रंगाचा ढोकळा ठेवा. त्यावर फोडणी, लिंबाचा रस, मीठ, लाल मिरची पावडर घाला. नंतर सफेद आणि शेवटी ऑरेंज कलरचा ढोकळा ठेवून त्यावर फोडणी, लिंबाचा रस, मीठ, लाल मिरची पावडर घाला. कोथिंबीर घालून सजवा.
Independence Day Special Tricolor Recipes

तिरंगी इडली
साहित्यः 3 कप तांदूळ, 1 कप उडदाची डाळ, चवीनुसार मीठ, 2 टेबलस्पून पालक किंवा हिरव्या मटारची प्युरी, 2 टेबलस्पून गाजराची प्यूरी, चिमुटभर ऑरेंज फूड कलर, थोडेसे तेल.
कृतीः पालक प्युरी बनवण्याकरिता – पालक धुऊन घ्या. पॅनमध्ये अर्धा कप पाणी घेऊन त्यात पालकाची पानं ठेवून 3-4 मिनिटं त्याला वाफवून घ्या. थंड करून मिक्सरमधून वाटून घ्या.
गाजराची प्युरी – 3 ते 4 गाजरांचे छोटे छोटे तुकडे करून ते वाफवून घ्या. थंड करून मिक्सरमधून ते वाटून घ्या.
इडली बनविण्याकरीता – तांदूळ आणि उडदाची डाळ धुऊन वाटून घ्या. मीठ घालून 8-10 तास झाकून ठेवा. तयार मिश्रण तीन भागात वाटून घ्या. हिरवी इडली बनविण्याकरिता एक भाग मिश्रणामध्ये पालक प्युरी घालून फेटून घ्या. तपकिरी रंग बनवण्याकरिता दुसर्‍या भागामध्ये गाजर प्युरी आणि ऑरेंज कलर घालून मिश्रण फेटून घ्या. तिसरा भाग तसाच राहू द्या. इडली पात्रास तेल लावून तिन्ही मिश्रण टाकून 10-12 मिनिटं शिजू द्या. तिरंगी इडली खोबर्‍याची चटणी आणि सांबार सोबत खा. Read More : श्रावण स्पेशल: कूल स्ट्रॉबेरी सूप (Cool Strawberry Soup)