हैदराबादी पाया शोरबा (Hyderabadi Paya Shorba)

हैदराबादी पाया शोरबा (Hyderabadi Paya Shorba)

हैदराबादी पाया शोरबा

साहित्य : मॅरिनेटसाठी : 1 मटण पाया (चार तुकडे केलेला), 1 टेबलस्पून मैदा, पाव टीस्पून हळद.

इतर : 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, 25 ग्रॅम आलं-लसूण-हिरव्या मिरचीची पेस्ट, 10 ग्रॅम मैदा, 1 कप दूध, 7 ग्रॅम पुदिन्याची पानं बारीक चिरलेली, 2 ग्रॅम कडिपत्ता, 1 ग्रॅम जिरे,
1 ग्रॅम लवंग, 2 ग्रॅम दालचिनी, 2 ग्रॅम काळी मिरी, 2-3 तेजपत्ते, 200 मिलिलीटर पाणी, 10 मिलिलीटर तेल, स्वादानुसार मीठ.

कृती : मॅरिनेटसाठीचं सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून 2-3 तास मॅरिनेट करत ठेवा. नंतर पाया व्यवस्थित धुऊन घ्या. कुकरमध्ये 5 मिलिलीटर तेल गरम करत ठेवा. त्यात कांदा, आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट आणि पाया घालून परतवून घ्या. त्यात 200 मिलिलीटर पाणी घालून कुकरचं झाकण लावा आणि 3 शिट्या काढा. नंतर आच मंद करून 20 मिनिटं शिजवा. आता दुसर्‍या पॅनमध्ये उर्वरित तेल गरम करून त्यात सर्व अख्खे मसाले घालून परतवा. त्यात मैदा घालून, तो हलका गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजा. नंतर त्यात पुदिना आणि कडिपत्ता घाला. थोड्या वेळाने त्यात अर्धा लीटर पाणी आणि पायाचं मिश्रण घालूजत ठेवा. शोरबा दाट वाटला तर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा 15 मिनिटं शिजवा. शेवटी दूध घालून दोन मिनिटं शिजवा आणि आच बंद करा. हैदराबादी पाया शोरबा गरमागरम सर्व्ह करा.