खमंग काकडी (Hot Spicy Cucumber)

खमंग काकडी (Hot Spicy Cucumber)

साहित्य : पाव किलो काकड्या, 1-2 हिरव्या मिरच्या, चवीला मीठ व साखर, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर.
फोडणीसाठी : 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, हिंग.
कृती : काकड्या सोलून, बारीक चिरा. थोडं मीठ लावून 5-10 मिनिटं ठेवा आणि पिळून त्याचं पाणी (हे पाणी ताकात घालून प्यायला छान लागते) काढून ठेवा. तुपाची हिंग, जिरं घालून फोडणी करा. काकडी, मीठ, साखर, लिंबाचा रस,
दाण्याचं कूट आणि फोडणी एकत्र करून कोशिंबीर कालवा. यात लिंबाच्या रसाऐवजी कैरीचा कीसही वापरता येतो.