मूग डाळीचे पुरण, खजूर-खसखसचे पुरण (Holi Specia...

मूग डाळीचे पुरण, खजूर-खसखसचे पुरण (Holi Special: Puran)

मूग डाळीचे पुरण

साहित्य : प्रत्येकी पाव किलो मुगाची डाळ व गूळ, साजूक तूप, बदाम-काजूची पूड, केशर, चिमूटभर वेलदोड्यांची किंवा जायफळ पूड.

कृती : मुगाची डाळ स्वच्छ धुऊन रात्रभर भिजत ठेवा. दुसर्‍या दिवशी पाणी निथळून मिक्सरमधून बारीक करून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्यात मुगाच्या डाळीचे वाटण खरपूस परतून घ्या. त्यात किसलेला गूळ, बदाम-काजूची पूड, वेलदोड्यांची वा जायफळ पूड व केशर घालून एकजीव करा. सारण पूर्णतः कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतवा.

खजूर-खसखसचे पुरण

साहित्य : 1 वाटी मऊ खजूर, पाव वाटी भाजलेल्या खसखशीची पूड, पाऊण वाटी पिठी साखर, वेलदोड्यांची पूड.

कृती : खजूर मिक्सरमधून बारीकवाटून घ्या. त्यात पिठी साखर, खसखस व वेलदोड्यांची पूड मिसळून