पुरणाचे मोदक (Holi Special : Modak Made From Pu...

पुरणाचे मोदक (Holi Special : Modak Made From Puran Stuffing)

पुरणाचे मोदक

साहित्य : प्रत्येकी 2 वाटी शिजवलेलं पुरण, तांदळाचं पीठ आणि पाणी, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून साजूक तूप.

कृती : पाणी उकळत ठेवून त्यात मीठ आणि साजूक तूप घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचं पीठ घालून, पटापट ढवळून मंद आचेवर 2 वाफा काढा. नंतर सोसवेल इतपत गरम असतानाच तांदळाची उकड चांगली मळून घ्या. तांदळाच्या उकडीचा लिंबाएवढा गोळा हातात घेऊन त्याला वाटीचा आकार द्या. त्यात पुरण भरून मोदक तयार करा. हे मोदक मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्या.