आरोग्यदायी कैरीचं पन्हं (Healthy Raw Mango Juice)

आरोग्यदायी कैरीचं पन्हं (Healthy Raw Mango Juice)

आयुर्वेदामध्ये कैरीचं स्थान अनन्य साधारण आहे. कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे ती उष्णतेच्या विविध तक्रारींमध्ये उपयुक्त ठरते. मात्र नुसती कैरी खाल्ली तर ती बाधू शकते; परंतु कैर्‍या उकडून केलेलं पन्हं बाधत नाही, उलट प्रकृतीसाठी हितकारक ठरतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. अशा वेळी कैरीचं पन्हं उत्तम असतं. पन्हं प्यायल्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी होतो.
कैरीचं पन्हं
साहित्य : 2 वाटी वाफवलेल्या कैरीचा गर, दीड वाटी गूळ किंवा साखर, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून वेलची पूड.
कृती : कैरीचा गर, गूळ किंवा साखर, मीठ आणि वेलची पूड एकत्र मिक्सरमध्ये चांगली वाटून घ्या. मिश्रण व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. त्यात साधारण वाटीभर पाणी घालून पुन्हा वाटा. हे मिश्रण काचेच्या स्वच्छ हवाबंद बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. पन्हं बनवायचं असेल तेव्हा या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार थंड पाणी एकत्र करा आणि थंडगार पन्हं सर्व्ह करा.
टीप : कैर्‍या (देठ न काढता) कुकरच्या भांड्यात ठेवून उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची सालं आणि कोय काढून केवळ गर बाजूला काढून घ्या.