हेल्दी दही वडा (Healthy Dahi wada)

हेल्दी दही वडा (Healthy Dahi wada)

हेल्दी दही वडा

साहित्यः 8 ब्रेड स्लाइस ( गोल आकारात कापून घ्या), 200 ग्रॅम पनीर, अर्धी वाटी काजूचे तुकडे व मनुके, अर्धा टीस्पून आलं पेस्ट, 3-4 हिरव्या मिरच्या, एक कप दूध, अर्धा किलो दही, मीठ, साखर, लाल मिरची पावडर व जिरेपूड चवीनुसार.

कृतीः पनीर कुस्करून त्यात आलं, हिरवी मिरची, काजू, मनुके, चवीमुसार मीठ घालून एकत्र करा. ब्रेड दुधात भिजवून लगेच निथळून घ्या. या ब्रेडमध्ये पनीरचे मिश्रण भरून वडे बनवा. दही फेटून त्यात चवीनुसार मीठ व साखर घाला. ब्रेडटे वडे एका सर्व्हिंग बाउलमध्ये घेऊन त्यावर दही घाला. मीठ, लाल मिरची पूड व जिरे पूड घालून चिंचेची चटणी व कोथिंबिर घालून सर्व्ह करा.