हेल्दी बाइट : आवळ्याचा मुरांबा (Healthy Bite: A...

हेल्दी बाइट : आवळ्याचा मुरांबा (Healthy Bite: Amla Murabba)

आवळ्यामध्ये अधिक प्रमाणात क जीवनसत्त्व असते. त्यामुळे आवळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो, तितकाच खाण्यासाठी तो स्वादिष्ट असतो. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच आपल्या आहारामध्ये आवळा जरूर असावा, आज आपण आवळ्याचा आंबट-गोड मुरांबा कसा करायचा ते पाहूया.

 

साहित्य –

१ किलो आवळा, सव्वा किलो साखर

४ ग्रॅम सायट्रिक ॲसिड,

अर्धा-अर्धा टीस्पून तुरटी (प्रत्येक वेळेसाठी)

 

कृती –

आवळे धुऊन सुरी किंवा काट्याने त्यावर टोचे मारून घ्या.

नंतर २ लीटर पाण्यामध्ये अर्धा चमचा तुरटी मिसळा.

या पाण्यामध्ये आवळे २४ तास बुडवून ठेवा.

त्यानंतर आवळे पुन्हा तुरटीच्या पाण्याने धुवा आणि २ मिनिटं मोठ्या आचेवर उकळवून घ्या.

साखर तीन चतुर्थ्यांश पाण्यामध्ये उकळवून पाक करून घ्या.

आता आवळे २४ तासांकरिता या पाकात बुडवून ठेवा.

नंतर पाकातून काढा आणि पाक पुन्हा एकदा गरम करा.

त्यात सायट्रीक ॲसिड घाला.

आता पाक गाळून घ्या आणि पुन्हा त्यात आवळे बुडवून ठेवा.

आवळे पाकातून काढून, पाक उकळवा आणि परत त्यात आवळे घालण्याची ही प्रक्रिया ४ वेळा करा. तयार मुरांबा काचेच्या जारमध्ये भरून ठेवा.

हा मुरांबा तयार होण्यास ५ दिवस लागतात. परंतु हा मुरांबा तुम्ही तीन महिने खाऊ शकता.