हेल्दी भेळ (Healthy Bhel)

हेल्दी भेळ (Healthy Bhel)

हेल्दी भेळ

साहित्य : 100 ग्रॅम मोड आलेलं मिश्र कडधान्य, 100 ग्रॅम पातळ लांबट चिरलेला कोबी, 25 ग्रॅम पातळ लांबट चिरलेली सिमला मिरची, 25 ग्रॅम पातळ लांबट चिरलेला गाजर,
1 टेबलस्पून हिरवी चटणी, 1 टेबलस्पून गोड चटणी, थोडा चाट मसाला, स्वादानुसार मीठ.

कृती :
मोड आलेलं कडधान्यं साधारण उकडून घ्या किंवा पॅनमध्ये थोड्या बटरवर परतवून घ्या. थंड झाल्यावर त्यात कोबी, सिमला मिरची आणि गाजर एकत्र करा. नंतर त्यात हिरवी-गोड चटणी आणि मीठ घालून व्यवस्थित एकजीव करा. शेवटी वरून चाट मसाला भुरभुरून स्प्राउट भेळ सर्व्ह करा.