गुंदा कैरी शाक (Gunda Kairi Shaak)

गुंदा कैरी शाक (Gunda Kairi Shaak)

गुंदा कैरी शाक

साहित्य : 100 ग्रॅम गुंद्याची भाजी, 1 कैरी, 5 ग्रॅम मीठ, 1 ग्रॅम लाल मिरची पूड, 1 ग्रॅम हिरवी मिरची, 1 ग्रॅम कोथिंबीर, 1 ग्रॅम हळद, 1 ग्रॅम आलं, 5 ग्रॅम गूळ, 1 ग्रॅम जिरं, अर्धा ग्रॅम कडिपत्ता, 1 ग्रॅम तेल, 2 ग्रॅम खोबरं.

कृती : गुंद्याची भाजी आणि कैरी बारीक चिरून घ्या. कढईमध्ये थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कडिपत्ता, हळद, लाल मिरची पूड आणि हिरवी मिरचीची पेस्ट यांची फोडणी करा. त्यात भाजी आणि कैरी घालून शिजवून घ्या. नंतर त्यात खोबरं, गूळ, साखर आणि मीठ एकत्र करा. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून गरमागरम सर्व्ह करा.