गुलाब मोदक (Gulab Modak)

गुलाब मोदक (Gulab Modak)

साहित्य : 2 कप कुस्करलेला मावा, 3 टेबलस्पून गुलकंद, 4 टेबलस्पून साखर, 5-10 लाल गावठी गुलाबाच्या पाकळ्या.
कृती : जाड बुडाच्या भांड्यात मावा दोन मिनिटं मंद आचेवर परतवून घ्या. नंतर त्यात साखर घालून मिश्रण दाट होईपर्यंत परतवा. नंतर त्यात गुलकंद घालून आच बंद करा. त्यात बारीक चिरलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून मिश्रण चांगलं एकजीव करा. मिश्रण थोडं थंड झालं की, ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये दाबून भरा आणि मोदक तयार करा.