मटार समोसा (Green Peas Samosa)

मटार समोसा (Green Peas Samosa)

मटार समोसा

साहित्य : अर्धा कप मैदा, अर्धा कप दूध, 1 टेबलस्पून तेल, पाव टीस्पून ओवा, 1 कप जाडसर वाटलेले मटार, अर्धा कप कुस्करलेला पनीर, थोडी मनुका व काजूचे बारीक तुकडे,
अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून बडीशेप पूड, स्वादानुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल.

कृती : मैदा, मीठ, ओवा, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून पीठ मळून घ्या. हे पीठ 15 मिनिटं झाकून ठेवा. एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात जाडसर वाटलेले मटार घालून त्यातील पाणी आटेपर्यंत परतवून घ्या. नंतर त्यात काजू, मनुका, पनीर, लाल मिरची पूड, बडीशेप पूड आणि मीठ एकत्र करून दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित परतवून घ्या. नंतर थंड होऊ द्या.

आता पिठाची लहान आणि पातळ पोळी लाटा. त्यास मध्यभागी चिर द्या, दोन अर्धगोलाकार तयार होतील. आता त्यातील एका भागावर सारण ठेवून समोशाचा आकार द्या. काठाला दूध लावून व्यवस्थित बंद करा आणि ते गरमागरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम समोसे हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचअपसोबत सर्व्ह करा.