जिंजर सूप (Ginger Soup)

जिंजर सूप (Ginger Soup)

जिंजर सूप


साहित्य : 2 टेबलस्पून किसलेलं आलं, 4 लाल मिरच्या जाडसर कुटलेल्या, 1 कप टोमॅटो प्युरी, स्वादानुसार मीठ, 5 कप पाणी, पाव कप कॉर्नफ्लोअर, 1 टीस्पून किसलेला लसूण, 1 टेबलस्पून बटर, 2 चिमूट काळी मिरी पूड.

कृती : एका पॅनमध्ये बटर गरम करा. त्यात आलं, लाल मिरची आणि लसूण मिनिटभर परतवा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा मिनिटभर परतवा. कॉर्नफ्लोअरचा कच्चा वास निघून गेला की, त्यात पाणी आणि टोमॅटो प्युरी घालून व्यवस्थित एकत्र करा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिश्रणाला चांगली उकळी आली की, त्यात काळी मिरी पूड आणि मीठ मिसळा आणि गरमागरम जिंजर सूप सर्व्ह करा.