आल्याचं लोणचं (Ginger Pickle)

आल्याचं लोणचं (Ginger Pickle)

आल्याचं लोणचंसाहित्य :
1 कप बारीक चिरलेलं आलं, अर्धा कप लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरलेल्या), 1 कप किसलेला गूळ, 1 कप लाल मिरची पूड, 1 कप चिंचेचा कोळ, 1 टेबलस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरे पूड, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी, 4 कडिपत्ते, 2 सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हळद, 1 टीस्पून उडीद डाळ, पाऊण कप मीठ, 1 कप तेल, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती : एका पॅनमध्ये 2 टीस्पून तेल गरम करा. त्यात आलं घालून साधारण सोनेरी रंग येईपर्यंत परतवा आणि बाजूला काढून ठेवा. आता त्याच पॅनमध्ये एक कप पाण्यात चिंचेचा कोळ मिसळून तीन-चार मिनिटं शिजवा. आच बंद करून थंड होऊ द्या. मिक्सरच्या भांड्यात चिंचेचं मिश्रण, आलं, लाल मिरची पूड, मीठ, हळद आणि गूळ घालून बारीक वाटून घ्या. आता एका फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात सुक्या मिरच्या, जिरं, हिंग, कडिपत्ते, हळद आणि लसूण घालून परतवून घ्या. आलं-चिंचेच्या मिश्रणावर ही फोडणी घालून लोणचं गरमच सर्व्ह करा.